NHM Sindhudurg Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “वैदयकिय अधिकारी (आयुष),वैदयकिय अधिकारी (एम.बी.बी.एस),अति विशेषज्ञ,स्पेशालिस्ट,कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य,कीटकशास्त्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ,सायकॉलॉजिस्ट,सामाजिक कार्यकर्ता,ऑडिओलॉजिस्ट,फिजिओथेरपिस्ट,टिबी पर्यवेक्षक,कार्यक्रम समन्वयक,कार्यक्रम सहाय्यक – सांख्यीकी,लेखापाल,आरोग्य सेविका,निम वैदयकिय कृष्ठरोग कर्मचारी,गटप्रवर्तक (महिला)” या पदांसाठी एकूण 98 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने असून इच्छुक उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांनी अर्ज हा स्वतः हजर राहून किंव्हा पोस्टाने सादर करायचा आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 नोव्हेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

🔶 भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग (NHM Sindhudurg Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
🔶 पदाचे नाव, पदसंख्या व वेतनमान :
अ.क्र | पद | पदसंख्या | वेतनमान (प्रती महिना) |
1 | वैदयकिय अधिकारी (आयुष) | 01 | रु.30,000/- |
2 | वैदयकिय अधिकारी (एम.बी.बी.एस) | 25 | रु.60,000/- |
3 | अति विशेषज्ञ | 03 | रु.1,25,000/- |
4 | स्पेशालिस्ट | 35 | रु.75,000/- |
5 | कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य | 04 | रु.35,000/- |
6 | कीटकशास्त्रज्ञ | 05 | रु.40,000/- |
7 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 07 | रु.35,000/- |
8 | सायकॉलॉजिस्ट | 02 | रु.30,000/- |
9 | सामाजिक कार्यकर्ता | 01 | रु.28,000/- |
10 | ऑडिओलॉजिस्ट | 01 | रु.25,000/- |
11 | फिजिओथेरपिस्ट | 03 | रु.20,000/- |
12 | टिबी पर्यवेक्षक | 02 | रु.20,000/- |
13 | कार्यक्रम समन्वयक | 01 | रु.20,000/- |
14 | कार्यक्रम सहाय्यक – सांख्यीकी | 01 | रु.18,000/- |
15 | लेखापाल | 01 | रु.18,000/- |
16 | आरोग्य सेविका | 04 | रु.18,000/- |
17 | निम वैदयकिय कृष्ठरोग कर्मचारी | 01 | रु.17,000/- |
18 | गटप्रवर्तक (महिला) | 01 | रु.9,225/- |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता :
🔸शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा.
🔶 वयोमर्यादा (Age Limit) :
- या भरतीमध्ये अराखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 38 वर्ष आहे.
- या भरतीमध्ये राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 43 वर्ष आहे.
🔶 अर्ज शुल्क (Application Fee)
- सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.150/- इतका अर्ज भरणा असेल.
- अर्ज शुल्काची रक्कम हि State Bank of India – SINDHUDURG DISTRICT INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY (NON PIP) यांच्या नावे भरायची आहे.
- A/C No : 40627414821
- IFSC Code : SBIN0004511
🔶 निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड शैक्षणिक गुण, अनुभव, आणि उच्च शिक्षणावर आधारित गुणांकन प्रणालीनुसार केली जाईल.
- काही पदांसाठी थेट मुलाखत आयोजित केली जाईल.
- निवड व प्रतीक्षा यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
🔶 ऑफलाईन अर्जाच्या महत्वाच्या तारखा व अर्ज करण्याचा पत्ता :
- अर्ज करण्याची तारीख : 24 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2025
- अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
🔶 अर्ज प्रक्रिया :
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात.
- अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे.
🔶 निष्कर्ष
ही भरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. कमी कालावधीतील कंत्राटी पदे असली तरी आरोग्य क्षेत्रात अनुभव मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित तारखांमध्ये अर्ज सादर करून ही संधी गमावू नये.
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत नवीन भरती जाहीर
साउथ इंडियन बँक अंतर्गत नवीन भरती
⚠️ महत्वाची सूचना : वरील मजकूर फक्त माहितीपुरता असून, अंतिम व अधिकृत माहिती वर दिलेल्या सविस्तर जाहिरातीत पाहावी.