Thane Mahanagarpalika Vacancy 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. या पदांसाठी एकूण 1773 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीमध्ये गट-क संवर्गातील पदांसाठी तब्बल 1621 तर गट-ड संवर्गातील पदांसाठी तब्बल 152 जागा असणार आहेत.
या जाहिरातीमध्ये दिलेली पदे हि प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
ज्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔶 भरती विभाग : ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika Vacancy 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 पद व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | गट-क | 1621 |
2 | गट-ड | 152 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा.
🔶 वयोमर्यादा (Age Limit)
- अराखीव : 18 ते 38 वर्ष
- मागासवर्गीय/अनाथ/खेळाडू/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : 18 ते 43 वर्ष
- दिव्यांग : 18 ते 45 वर्ष
🔶 अर्ज शुल्क (Application Fee)
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रु.1000/-
- मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रु.900/-
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 12 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2025
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
AAI भरती 2025
Bank Of Maharashtra भरती 2025
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.