NHM Pune Vacancy 2025
NHM Pune Vacancy 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “औषध निर्माण अधिकारी, समुपदेशक, एक्स-रे टेक्निशियन” या पदांसाठी प्रत्येकी 01 अशा एकूण 03 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने असून इच्छुक उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 17 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांनी अर्ज हा स्वतः हजर राहून सादर करायचा आहे. इतर कोणत्याही पध्दतीचा अवलंब करणेत येवू नये याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

- भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
पदाचे नाव व पदसंख्या
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | औषध निर्माण अधिकारी | 01 |
2 | समुपदेशक | 01 |
3 | एक्स-रे टेक्निशियन | 01 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- औषध निर्माण अधिकारी
- डी.फार्म / बी.फार्म, एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- एन.एच.एम / शासकिय अनुभव प्राधान्य दिले जाईल.
- समुपदेशक
- सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानसशास्त्र या विषयात पदवी / डिप्लोमा / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- एन.टी.इ.पी मध्ये अनुभव किंवा सल्लागार म्हणून काम केलेले.
- संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.
- एक्स-रे टेक्निशियन
- 10वी / 12वी व रेडिओलॉजी किंवा एक्स-रे मध्ये डिप्लोमा.
वयोमर्यादा (Age Limit)
- अराखीव प्रवर्ग : 18 ते 38 वर्ष
- राखीव प्रवर्ग : 18 ते 43 वर्ष
अर्ज शुल्क (Application Fee)
- सर्व पदे : – रु. 300/-
- Deputy Director Health Services Pune यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे.
वेतनमान (Pay scale)
- औषध निर्माण अधिकारी : रु.17,000/- प्रती महिना.
- समुपदेशक : रु.20,000/- प्रती महिना.
- एक्स-रे टेक्निशियन : रु.17,000/- प्रती महिना.
ऑफलाईन अर्जाच्या महत्वाच्या तारखा व अर्ज करण्याचा पत्ता
- अर्ज करण्याची तारीख : 17 जुलै 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2025
- अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे – 411001.
अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील पुनर्वसन शाखा, पुणे भरती
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक भरती