Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर, ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया येथे!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिकेकडून गट-क संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवेने नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या पदांसाठी एकूण 174 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 1
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

🔶 भरती विभाग : नागपूर महानगरपालिका (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

🔶 पद व पदसंख्या :

अ.क्रपदपदसंख्या
1कनिष्ठ लिपिक60
2विधी सहायक06
3कर संग्राहक74
4ग्रंथालय सहायक08
5स्टेनोग्राफर10
6लेखापाल/रोखपाल10
7सिस्टम अ‍ॅनालिस्ट01
8हार्डवेअर इंजिनिअर02
9डेटा मॅनेजर01
10प्रोग्रामर02
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).

🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  1. कनिष्ठ लिपिक/कर संग्राहक :
    • पदवीधर
    • मराठी 30 wpm व इंग्रजी 40 wpm टंकलेखन
    • संगणक पात्रता.
  2. विधी सहायक :
    • विधी शाखेची पदवी
    • 5 वर्षांचा अनुभव
  3. ग्रंथालय सहायक :
    • दहावी उत्तीर्ण
    • लायब्ररी सर्टिफिकेट कोर्स.
  4. स्टेनोग्राफर :
    • पदवीधर
    • इंग्रजी/मराठी शॉर्टहॅण्ड
    • संगणक पात्रता
  5. लेखापाल/रोखपाल :
    • वाणिज्य शाखेची पदवी
    • DFM/GDC&A/LGSD
    • 5 वर्षांचा अनुभव
  6. सिस्टम अ‍ॅनालिस्ट/हार्डवेअर इंजिनिअर/डेटा मॅनेजर/प्रोग्रामर :
    • संगणक अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
    • संबंधित अनुभव

🔶 वयोमर्यादा (Age Limit)

  1. अराखीव प्रवर्ग : किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्ष.
  2. मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ उमेदवार : किमान 18 वर्षे ते कमाल 43 वर्ष.
  3. दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त : किमान 18 वर्षे ते कमाल 45 वर्ष.
  4. पदवीधर अंशकालीन उमेदवार : किमान 18 वर्षे ते कमाल 55 वर्ष.

🔶 अर्ज शुल्क (Application Fee)

  • अराखीव प्रवर्ग : रु.1000/-
  • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ : रु.900/-
  • माजी सैनिक : शुल्क माफ
    • परीक्षा शुल्क ना-परतावा (नॉन-रिफंडेबल) आहे.

🔶 वेतनश्रेणी

  1. पद क्र. 1,3 व 4 या पदांसाठी : रु.19,900/- ते रु.63,200/- प्रति महिना
  2. पद क्र. 2,5,7,8 व 9 या पदांसाठी : रु.38,600/- ते रु.1,22,800/- प्रति महिना
  3. पद क्र. 6 या पदासाठी : रु.35,400/- ते रु.1,12,400/- प्रति महिना
  4. पद क्र. 10 या पदासाठी : रु.25,500/- ते रु.81,100/- प्रति महिना

🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख : 26 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2025

🔶 निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे :

  • संगणकाधारित परीक्षा (CBT) : 100 प्रश्न, 200 गुण, कालावधी 2 तास
  • गुणपात्रता :
    • सामान्य प्रवर्ग : 50% गुण आवश्यक
    • मागासवर्गीय : 45% गुण आवश्यक
  • मुलाखत (Interview) : केवळ काही विशिष्ट पदांसाठी
  • अंतिम निवड : मेरिट यादीच्या आधारे

🔶 अर्ज प्रक्रिया

  1. अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. Recruitment / Apply Online लिंकवर क्लिक करा.
  3. New Registration करून नाव, DOB, मोबाईल, ई-मेल टाका.
  4. मोबाईलवर आलेला OTP टाकून खाते सक्रिय करा.
  5. लॉगिन आयडी-पासवर्डने लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.
  6. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील व कागदपत्रे अपलोड करा.
  7. सर्व तपासून Final Submit करा.
  8. अर्ज शुल्क भरा.
  9. अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

🔶 महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात व अटी-शर्ती नीट वाचूनच अर्ज करावा.
  • अपूर्ण/चुकीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • आरक्षणाचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी उमेदवारांनाच लागू होईल.
  • प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

🔶 आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (SSC, HSC, Degree, Diploma इ.)
  • जन्मतारीख/वयाचा पुरावा
  • आधार कार्ड/ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र व जात वैधता (लागल्यास)
  • EWS/Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागल्यास)
  • महाराष्ट्र अधिवास दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र (लागल्यास)
  • समांतर आरक्षणासाठी प्रमाणपत्रे (दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ इ.)
  • संगणक/टंकलेखन प्रमाणपत्र (लागल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो व सही

🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्ज (26 ऑगस्ट 2025)येथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

मिरा भाईंदर महानगरपालिकेत भरती जाहीर

गुप्तचर विभागात मोठी भरती जाहीर

⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram
error: Content is protected !!
WhatsApp