Maharashtra SSC Results 2025 | महाराष्ट्र राज्याचा इयत्ता 10वी चा निकाल जाहीर, राज्यात यंदा कोण मारणार बाजी? सविस्तर माहिती येथे पहा..!

Maharashtra SSC Results 2025

Maharashtra SSC Results 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) म्हणजेच इ. 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,लातूर व कोकण अशा एकूण 9 विभागांचा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) म्हणजेच इ. 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. तरी हा निकाल आज वार मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे.

ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यास कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने प्राप्त केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक 14 मे 2025 ते बुधवार दिनांक 28 मे 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

Maharashtra SSC Results 2025 Main
Maharashtra SSC Results 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

निकाल पहावयाचे अधिकृत संकेतस्थळ

अ.क्रअधिकृत संकेतस्थळ
1https://results.digilocker.gov.in
2https://sscresult.mahahsscboard.in
3http://sscresult.mkcl.org
4https://www.mahahsscboard.in/
5https://main.mahahsscboard.in/mr
6https://sscresult.mahahsscboard.in/

सविस्तर जाहिरात येथे पहा : येथे क्लिक करा

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram
error: Content is protected !!
WhatsApp