Konkan Railway Recruitment 2025 : कोकण रेल्वे अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरतीमध्ये “सहाय्यक विद्युत अभियंता,वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल),कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल),तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल)” या पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी एकूण 80 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. नियुक्ती ही करार पद्धतीने (Contract Basis) वर केली जाणार असून सुरुवातीचा कालावधी 3 वर्षांचा असेल. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी खाली दिलेला अर्ज, आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीस हजर रहायचे आहे.

🔶 भरती विभाग : कोकण रेल्वे (Konkan Railway Recruitment 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
🔶 संस्था व पदसंख्या :
अ.क्र | संस्था | पदसंख्या |
1 | सहाय्यक विद्युत अभियंता | 10 |
2 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) | 19 |
3 | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) | 21 |
4 | तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) | 30 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- सहाय्यक विद्युत अभियंता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पदवीधरांसाठी किमान 6 वर्षे अनुभव.
- डिप्लोमा धारकांसाठी 8 वर्षे अनुभव.
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पदवीधरांसाठी किमान 1 वर्षे अनुभव.
- डिप्लोमा धारकांसाठी 3 वर्षे अनुभव.
- कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- डिप्लोमा धारकांसाठी 3 वर्षे अनुभव.
- तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) :
- इलेक्ट्रिकल ट्रेड मधून आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किमान 3 वर्षे अनुभव
🔶 वयोमर्यादा
- सहाय्यक विद्युत अभियंता/वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) : कमाल वय : 45 वर्षे
- कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल)/तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) : कमाल वय: 35 वर्षे
- ओ.बी.सी : 03 वर्ष सूट
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 05 वर्ष सूट
🔶 अर्ज शुल्क
या भरतीसाठी जाहिरातीमध्ये अर्ज भरणा हा देण्यात आलेला नाही.
🔶 वेतनश्रेणी

🔶 महत्वाची कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (मूळ व झेरॉक्स)
- जन्मतारीख पुरावा
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS उमेदवारांसाठी)
- अनुभव प्रमाणपत्र
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- गॅझेटेड ऑफिसर कडून चारित्र्य प्रमाणपत्र
🔶 मुलाखत वेळापत्रक
- सहाय्यक विद्युत अभियंता : 12 सप्टेंबर 2025
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) : 15 सप्टेंबर 2025
- कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) : 16 सप्टेंबर 2025
- तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) : 18 सप्टेंबर 2025
- नोंदणी वेळ: सकाळी 09:00 ते दुपारी 12:00
- पत्ता : Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.
🔶 निवड प्रक्रिया
- थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
- मुलाखती वेळी अर्ज, कागदपत्रांची छाननी व नंतर मुलाखत घेतली जाईल.
🔶 महत्त्वाच्या सूचना
- ही भरती करार पद्धतीने आहे.
- कायमस्वरूपी नोकरीसाठी दावा करता येणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभरातील प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी नेमलं जाऊ शकतं.
- निवड झालेल्या उमेदवारांनी 30 दिवसांच्या आत रुजू व्हावे लागेल.
- राहण्याची व जेवणाची सोय कोकण रेल्वे कडून केली जाणार नाही.
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहीर
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.