Jilhadhikari Karyalay Dharashiv Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरतीमध्ये “जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी” या पदासाठी भरती होणार आहे. या पदासाठी 01 जागा जाहीर करण्यात आली आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 21 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

🔶 भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव (Jilhadhikari Karyalay Dharashiv Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 संस्था व पदसंख्या :
अ.क्र | संस्था | पदसंख्या |
1 | जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी | 01 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- 03 वर्षाचा अनुभव त्यामध्ये किमान 02 वर्षाचा आपत्ती व्यवस्थापनातील अनुभव असणे आवश्यक.
- मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
🔶 वेतनश्रेणी
- निवड झालेल्या उमेदवाराला अंदाजे ₹75,000/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 21 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2025
🔶 अर्जदाराने अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या शासकीय स्व-सभांकित केलेल्या प्रती जोडणे बंधनकारक आहे :
- किमान शैक्षणिक अर्हता व त्यावरील शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला.
- 3 वर्षांचा अनुभव त्यातील किमान 2 वर्षे अनुभव आपली व्यवस्थापनातील असल्याबाबत प्रमाणपत्र.
- शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
- प्रकल्प हाताळण्याचा पूर्वानुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
- महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र.
- लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
🔶 पात्रतेच्या अटी व शर्ती :
- इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेचे विविध टप्पे व मुलाखतीसाठी संकेतस्थळावर www.dharashiv.maharashtra.gov.in नमूद दिनांक व वेळेनुसार उपस्थित रहावे. पत्राद्वारे कोणताही संपर्क होणार नाही. आवश्यकता भासल्यास ई-मेल द्वारेच कळविले जाईल.
- निवड प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरलेल्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- उमेदवाराने स्वतःच्या उमेदवारी संदर्भात कोणाताही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारी अपात्र ठरविली जाईल.
- निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्ती नंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी असल्यास, किंवा कागदपत्रे खोटी असल्यास, त्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात येईल.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती देण्याचा सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे असेल. नियुक्ती देणे हे जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक नाही. नियुक्ती ही तात्पुरती असेल.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवाराचे नियुक्तीपत्र दिल्यानंतर नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक आहे. अन्यथा नियुक्ती आपोआप रद्द होईल आणि पुढील नियुक्तीस अपात्र ठरेल.
- मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीपत्र देण्यात येईल.
- उमेदवारास नियुक्तीनंतर चारित्र्य पडताळणी अहवाल असमाधानकारक आढळल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.
🔶 महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने आपला सोबतच्या नमुन्यातील अर्ज A-4 साईजच्या पांढऱ्या कागदावर टंकलिखित/हस्तलिखित करून मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव – 431501 या पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज दिनांक 21.08.2025 ते दिनांक 04.09.2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. (पोस्टाद्वारे किंवा थेट कार्यालयात जमा करून).
- अर्जदारांनी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे प्रत्यक्ष सादर करावा.
- सुट्टीचे दिवस वगळता, कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील.
- अर्जाच्या पाकिटावर ठळक अक्षरात पदाचे नाव नमूद करणे बंधनकारक आहे.
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
नागपूर महानगरपालिकेत गट-क संवर्गातील 174 पदांसाठी भरती जाहीर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज भरती
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.