India Post GDS Result 2025 Merit List
India Post GDS Result 2025 Merit List : मध्यंतरी भारतीय पोस्टाने ग्रामीण डाक सेवक या पदासाठी भरती जाहीर केली होती. त्याचाच आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये राजस्थान वगळता इतर 22 राज्यांसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे, तरी निवडलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून आपला निकाल पहावयाचा आहे.
हि भरतीप्रक्रिया दहावीच्या बोर्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित घेण्यात आली होती. आणि यामध्ये मेरीट लिस्टच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच उमेदवारांची ज्या विभागासाठी निवड करण्यात आलेली आहे त्या विभाग प्रमुखांकडून मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून घेतली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
तसेच निवडलेल्या उमेदवारांनी 07/04/2025 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांकडून त्यांचे कागदपत्रे पडताळून घ्यावीत. निवडलेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि सर्व संबंधित कागदपत्रांच्या दोन स्व-प्रमाणित छायाप्रतींसह पडताळणीसाठी हजर राहावे.
तसेच या निकालात ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंव्हा ईमेल आयडीवर एस.एम.एस किंव्हा ईमेल पाठवला जाईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
आणि ज्या उमेदवारांचे या भरतीमध्ये सिलेक्शन झाले आहे त्यांचे माझी भरती कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या..!

अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
निकाल संकेतस्थळ | येथे क्लिक करा |