GMC Ratnagiri Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक” या पदांसाठी 37 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
हि भरतीप्रक्रिया पूर्णपणे थेट मुलाखती द्वारे घेण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे दि. 25 जुलै 2025 स. 11:00 वाजेपासून ते दि. 01 ऑगस्ट 2025 सायं. 05:00 वाजेपर्यंत सदरहू पदासाठीचे अर्ज हे वरील कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सादर करायचे आहेत. ऑफलाईन पद्धतीचा अर्ज ह्या पत्त्यावरती मिळतील.
सदरची नेमणूक हि पूर्णतः करार तत्वावरील पद भरतीच्या जाहिरातीमध्ये अंशतः पुर्णतः बदल करण्याचे अथवा सदरील जाहिरात रद्द करण्याचे सर्वाधिकार निम्नस्वाक्षरीकार यांनी राखून ठेवलेले आहेत. निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीची तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

🔶 भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी (GMC Ratnagiri Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार आहे.
🔶 पदाचे नाव व पदसंख्या
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | प्राध्यापक | 17 |
2 | सहयोगी प्राध्यापक | 20 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
🔶 शैक्षणिक पात्रता
🔸राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार शैक्षणिक पात्रता असेल.
🔶 वयोमर्यादा (Age Limit)
🔸या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा हि 70 वर्ष आहे.
🔶 अर्ज शुल्क (Application Fee)
- खुला/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ओ.बी.सी : –
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/माजी सैनिक/महिला : –
🔶 वेतनमान (Pay scale)
- प्राध्यापक : रु.2,00,000/- प्रती महिना.
- सहयोगी प्राध्यापक : रु.1,85,000/- प्रती महिना.
🔶 महत्वाच्या तारखा व मुलाखतीचा पत्ता
- अर्ज करण्याची तारीख : 25 जुलै 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2025
- मुलाखतीची तारीख : कळविण्यात येईल
- मुलाखतीचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होडेकर रोड, उद्यमनगर, पटवर्धन वाडी, रत्नागिरी 415612
🔶 महत्वाच्या अटी
- प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांची करार तत्वावरील पद भरतीच्या जाहिरातीमध्ये अंशतः पुर्णतः बदल करण्याचे अथवा सदरील जाहिरात रद्द करण्याचे सर्वाधिकार निम्नस्वाक्षरीकार यांनी राखून ठेवलेले आहेत.
- उमेदवारास स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल, त्यासाठी कोणत्याही स्वरुपाचा मोबदला दिला जाणार नाही.
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मुळ कागदपत्र सोबत आणणे बंधनकारक राहील.
🔶 सविस्तर जाहिरात
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
भारत पेट्रोलियम भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, धाराशिव भरती
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.