District Civil Hospital Nashik Vacancy 2025 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई व जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक मार्फत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग (DAPCU), नाशिक अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “रक्तपेढी सल्लागार व रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. या पदांसाठी एकूण 07 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
ज्या उमेदवारांना जिल्हा नागरी रुग्णालय नाशिक अंतर्गत रक्तपेढी सल्लागार व रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔶 भरती विभाग : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई व जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक (District Civil Hospital Nashik Vacancy 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 पद व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | रक्तपेढी सल्लागार | 04 |
2 | रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- रक्तपेढी सल्लागार
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानसशास्त्र/मानववंशशास्त्र/मानव विकास या विषयात पदव्युत्तर पदवी.
- संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
- 02 वर्ष अनुभव.
- रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) डिप्लोमा/पदवी.
- संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
- 02 वर्ष अनुभव.
🔶 वयोमर्यादा (Age Limit)
- खुला प्रवर्ग : 60 वर्ष
🔶 अर्ज शुल्क (Application Fee)
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : –
- मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी : –
🔶 वेतनमान
- रक्तपेढी सल्लागार: रु.21,000/- प्रती महिना
- रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ : रु.25,000/- प्रती महिना
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 13 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2025
🔶 अर्ज सादर करण्याचा पत्ता :
District Aids Prevention & Control Unit,(D.A.P.C.U) District Civil Hospital, Beside Outrich R.M.O. Office, Above Record Room, Trambak Roa4 Near Golf Club Groun4 Nashik DistNashik Pin Code 422OOZ
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
Bank Of Maharashtra भरती 2025
ठाणे महानगरपालिका भरती 2025
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.