Civil Hospital Solapur Bharti 2025 : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर (Civil Hospital Solapur) येथे गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील ही भरती सरळ सेवा पद्धतीने केली जाणार आहे.
या भरती अंतर्गत “कक्षसेवक,बाह्यरुग्ण विभाग सेवक,शिपाई,माळी,पंपसहवर्ती,क्ष-किरण सेवक,प्रयोगशाळा सेवक,चतुर्थश्रेणी कर्मचारी,रुग्णपटवाहक,सहाय्यक स्वयंपाकी,परिचारिका जेवण विभाग सेवक,भांडार सेवक,पोस्ट मॉर्टेम रूम परिचर” हि पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी एकूण 153 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 22 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

🔶 भरती विभाग : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर (Civil Hospital Solapur Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 पद व पदसंख्या :
| अ.क्र | पद | पदसंख्या |
| 1 | कक्षसेवक | 123 |
| 2 | बाह्यरुग्ण विभाग सेवक | 09 |
| 3 | शिपाई | 03 |
| 4 | माळी | 01 |
| 5 | पंपसहवर्ती | 01 |
| 6 | क्ष-किरण सेवक | 01 |
| 7 | प्रयोगशाळा सेवक | 02 |
| 8 | चतुर्थश्रेणी कर्मचारी | 02 |
| 9 | रुग्णपटवाहक | 01 |
| 10 | सहाय्यक स्वयंपाकी | 03 |
| 11 | परिचारिका जेवण विभाग सेवक | 03 |
| 12 | भांडार सेवक | 02 |
| 13 | पोस्ट मॉर्टेम रूम परिचर | 02 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- उमेदवाराने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- मराठी भाषेचे ज्ञान (वाचता व लिहिता येणे आवश्यक).
🔶 वयोमर्यादा
- अराखीव/खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अनाथ/खेळाडू/ओ.बी.सी : 18 ते 43 वर्ष
- दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त : 18 ते 45 वर्ष
🔶 अर्ज शुल्क (Application Fee)
- खुल्या/सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 1000/- अशी फी भरावी लागेल.
- मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 900/- अशी फी भरावी लागेल.
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ राहील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.
🔶 वेतनमान
- निवड झालेल्या उमेदवाराला रु.15,000/- ते रु.47,600/- एवढे मासिक वेतन असेल.
🔶 परीक्षा पद्धत
- Computer Based Test (CBT) स्वरूपातील परीक्षा होणार आहे.
- एकूण 100 प्रश्न (200 गुण)
- प्रत्येक प्रश्नाला 2 गुण.
- विषय :
- मराठी भाषा
- इंग्रजी भाषा
- सामान्य ज्ञान
- बुद्धिमापन चाचणी
- विषय :
- पात्रतेसाठी किमान 45% गुण आवश्यक.
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 22 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2025
- फी भरण्याची अंतिम तारीख : 12 नोव्हेंबर 2025
🔶 महत्वाची कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- रहिवासी दाखला
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- फोटो व सही
- ओळखपत्र (आधार / पॅन / मतदार कार्ड)
🔶 अर्ज प्रक्रिया
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- नवीन नोंदणी (New Registration)
- लॉगिन करून अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- परीक्षा शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करा व प्रिंट घ्या.
🔶 महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती असल्यास अर्ज बाद केला जाईल.
- अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
- शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज पूर्ण करा.
- एका पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येकासाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क आवश्यक.
- अर्ज सादर करताना “I Agree” बटण क्लिक करणे अनिवार्य आहे.
🔶 निष्कर्ष
सोलापूर जिल्हा रुग्णालय भरती 2025 ही बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. कमी शैक्षणिक पात्रतेवर सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करून आपली पात्रता सिद्ध करावी.
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत नवीन भरतीची घोषणा
भारतीय रेल्वेची भरतीसाठी मोठी घोषणा
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.