Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय आणि टो.रा. वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या पदासाठी एकूण 69 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन स्वरुपात कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 01 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
तसचे अर्ज हा स्वतः हजर राहून सादर करायचा आहे. पोस्टाद्वारे आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा. अर्ज करताना उमेदवारांनी खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔶 भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय आणि टो.रा. वैद्यकीय महाविद्यालय (Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 पद व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | वरिष्ठ सल्लागार | 01 |
2 | नेफ्रोलॉजिस्ट | 01 |
3 | रक्त संक्रमण अधिकारी | 01 |
4 | मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट | 02 |
5 | भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी) | 01 |
6 | कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ | 01 |
7 | दूरध्वनी चालक | 01 |
8 | डेटा एंट्री ऑपरेटर | 30 |
9 | क्ष-किरण सहाय्यक | 10 |
10 | प्रयोगशाळा सहाय्यक | 18 |
11 | व्ही.सी.तंत्रज्ञ (E.C.G.) | 01 |
12 | ए.आर.सी सल्लागार | 01 |
13 | ऑर्थोटिक तंत्रज्ञ | 01 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा.
🔶 वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्ष पेक्षा जास्त असता कामा नये.
🔶 अर्ज शुल्क
- एकूण रु.933/- अशी फी भरावी लागेल.
- हे शुल्क ना परतावा राहील.
🔶 वेतनश्रेणी
- पात्र उमेदवारांना त्यांच्या पदानुसार रु.16,000/- ते रु.2,00,000/- प्रति महिना इतके वेतनमान असेल.
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 01 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2025
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय आणि टो.रा. वैद्यकीय महाविद्यालय आवक/जावक विभाग.
🔶 निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड खालील टप्प्यांवर होईल –
- शैक्षणिक अर्हता
- मुलाखत
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
SSC मार्फत 509 पदांची भरती जाहीर
भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत भूकरमापक पदासाठी मोठी भरती जाहीर
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.