Bhumi Abhilekh Bharti 2025 Maharashtra : भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गातील “भूकरमापक” हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी एकूण 903 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 01 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
ज्या उमेदवारांना भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत भूकरमापक या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔶 भरती विभाग : भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन (Bhumi Abhilekh Bharti 2025 Maharashtra) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 विभाग व पदसंख्या :
अ.क्र | विभाग/प्रदेश | पदसंख्या |
1 | पुणे प्रदेश | 83 |
2 | कोकण प्रदेश, मुंबई | 259 |
3 | नाशिक प्रदेश | 124 |
4 | छ. संभाजीनगर प्रदेश | 210 |
5 | अमरावती प्रदेश | 117 |
6 | नागपूर प्रदेश | 110 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- भूकरमापक :
- 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षाचा आय.टी.आय प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने किमान स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
- संगणकीय टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- टायपिंग स्पीड :
- मराठी टायपिंग – 30 शब्द प्रति मिनिट
- इंग्रजी टायपिंग – 40 शब्द प्रति मिनिट
🔶 वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग : 18 वर्षे ते 38 वर्ष
- मागासवर्गीय/खेळाडू प्रवर्ग : 18 वर्षे ते 43 वर्ष
- प्रकल्पग्रस्त/दिव्यांग/भूकंपग्रस्त : 18 वर्षे ते 45 वर्ष
🔶 अर्ज शुल्क
- अमागास प्रवर्गातील उमेदवारांना रु.1000/- अशी फी भरावी लागेल.
- मागास प्रवर्गातील उमेदवारांना रु.900/- अशी फी भरावी लागेल.
- माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आलेली आहे.
🔶 वेतनश्रेणी
- पात्र उमेदवारांना रु.19,900/- ते रु.63,200/- प्रति महिना इतके वेतनमान असेल.
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 01 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025
🔶 निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड खालील टप्प्यांवर होईल –
- ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test)
- कागदपत्र पडताळणी
- अंतिम गुणवत्ता यादी
🔶 अर्ज प्रक्रिया
- वरील अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- “New Registration” वर क्लिक करून खाते तयार करा.
- सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
- ऑनलाईन फी भरा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट घ्या.
🔶 महत्वाची कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (दहावी/बारावी/डिप्लोमा/पदवी)
- जन्मतारीख दाखला
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- रहिवासी दाखला
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणे अंतर्गत “लेखनिक” पदासाठी भरती जाहीर
SSC मार्फत 509 पदांची भरती जाहीर
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.