VNMKV Parbhani Bharti 2025
VNMKV Parbhani Bharti 2025 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत नवीन भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या भरतीसाठी फक्त 4थी व 7वी पास असणे आवश्यक आहे. तसेच ज्या स्थावर मालमत्ता धारकांनी प्रत्यक्षात या कृषी विद्यापीठाकरिता आपली घरे व जमिनी शासन धोरणानुसार अधिगृहित केलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तामधून कृषी विद्यापीठातील “गट क व गट ड“ या संवर्गातील पदांसाठी एकूण 369 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
त्या एकूण भरावयाच्या पदांपैकी 50 टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तामधून भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यायचा आहे.
ऑफलाईन पद्धतीचा अर्ज व सविस्तर जाहिरात यांची लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज हा प्रत्यक्ष येऊन सादर करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. जर इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज प्राप्त झाला तर त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 02 जुलै 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 ऑगस्ट 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

- भरती विभाग : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
पदाचे नाव व पदसंख्या
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | पहारेकरी | 62 |
2 | मजूर | 307 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- पहारेकरी
- इयत्ता 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा सुदृढ प्रकृती असणारा हवा.
- माजी सैनिक असल्यास प्राधान्य.
- मजूर
- इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संबधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा (Age Limit)
- खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्ष असणार आहे.
- राखीव प्रवर्ग : 18 ते 43 वर्ष असणार आहे.
अर्ज शुल्क (Application Fee)
- खुला प्रवर्ग : रु.1000/- असणार आहे.
- राखीव प्रवर्ग : रु.900/- असणार आहे.
- (Comptroller, Recruitment Account VNMKV Parbhani) State Bank Of india, VNMKV Campus, Parbhani Branch Code 20317 IFSC CODE SBIN0020317. यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
वेतनमान (Pay scale)
- पहारेकरी : रु.15,000/- ते 47,600/- प्रती महिना.
- मजूर : रु.15,000/- ते 47,600/- प्रती महिना.
अर्जाच्या महत्वाच्या तारखा व अर्ज सादर करण्याचा पत्ता
- अर्ज करण्याची तारीख : 02 जुलै 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2025
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : कुलसचिव कार्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासकीय इमारत परभणी – 431402
अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन भरती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती